Tuesday, August 18, 2009

असं का होत की खूप आभाळ भरून येत, पण तेव्हा पाऊस येतच नाही,ढग निघून जातात,आपण वाट बघण सोडून देतो,आणि तेवढ्यात अचानक जोरात सरी येतात,नकळत....

संध्याकाळच्या वेळी खर तर माझा मेंदू फार चालत नाही, पण आज खूप दिवसानी आभाळ भरून आल आणि मनात विचारांचीही गर्दी झाली...

बराच वेळ पाऊस आलाच नाही, मी खिडकीत बसून वाट बघत राहिले गडद रंगाकडे बघत , कल्पना रंगवत .... पण अचानक सोसाट्याचा वारा आला अणि सगळे ढग गायब झाले,पुन्हा तेच निरभ्र आभाळ...आणि परत तिच संध्याकाळ.. माझा हिरमोड झाला आणि मी पुन्हा अभ्यासाला बसले...
इतक्यात मातीचा वास आला आणि पावसाला सुरुवात झाली...धुवाधार पाऊस पडला अगदी आषाढ महिन्यासारखा..सगळ धुवून स्वच्छ निघाल...माझ्या मनावरची सकाळपासूनची जळमट कमी झाली।
माझ्या आयुष्यात नेहमी असच का होत?? तक्रार नाही पण कित्येक गोष्टींची मी जीव तोडून वाट बघते,स्वप्न पाहते पण नाही... कितीही धीर ठेवला तरी एक दिवस असा येतो की मी वाट बघण बंद करते आणि मान्य करते की ती गोष्ट आपल्या नशीबात नाही, किंवा positively असा विचार करते की कदाचित देवाने अजुन काहीतरी चांगला विचार केला असेल माझ्यासाठी...पुन्हा नवीन plans आणि नवी सुरुवात..पण इथेच खरी गम्मत सुरु होते आणि ती गोष्ट मला अचानक मिळते even in better form... पण का कुणास ठाउक तिची किम्मत रहात नाही ...
हे चुकीच आहे माझ मला कळत, पण वाट बघताना झालेला त्रास कायम असतो मनात... आणि त्या गोष्टीची तेवढी गरजही नाही अस वाटून मी पुढे जाते...आणि हा pattern झालाय आयुष्यात...आणि even for smallest of things like an even ice-cream with family...
वाईट वाटत की मी एन्जॉय नाही करू शकत gifts or even cant think it as gift...
मग असही वाटत अपेक्षा ठेवूच नयेत का आयुष्याकडून??? का ddlj तल्या dialogue सारख स्वप्न पूर्ण होण्याची अपेक्षा ठेवू नये...??
एक मध्य मार्ग काढला यावर मध्ये खूप प्रयत्न करूनही हव ते मिळत नसेल तर आधीच accept करायच जास्त विचार नाही करायचा[ मला आधीही accept कराव लागायच पण ते compulsory असायच आता मी ते मनाला समजावून करते which hurts less...] at least i 'feel' i can control it....even if it's illusion..but it does help to move on n not let future dreams die...saves energy for better things..n helps me to survive...n anything that helps me to survive n stand straight once again is the right thing...
after all it's even important to survive to make ultimate dreams come true...n still Darwinian philosophy holds true survival of the fittest..आणि हो how can i forget
महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळी वाचती....